मुंबई (वृत्तसंस्था) ईडीच्या कारवाईला राजकीय रंग असल्याचे सांगत भाजपचे लोक ईडीच्या कार्यालयात बसले आहेत की ईडीचे लोक भाजपच्या कार्यालयात बसले आहेत, याचा शोध घेण्याची गरज असल्याचा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
नोटीस येत आहेत, त्याबाबत राजकीय दबाव आहे. एका पक्षाचे, भाजपचे नेते सोशल मीडियावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची यादी जाहीर करत आहेत, यांना ईडी बोलवणार. हे ईडीचं समन्स आहे की भाजपचं हा संभ्रम आहे. भाजपचे प्रमुख लोक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या १० लोकांची यादी जाहीर केली, भाजपचे लोक ईडी कार्यालयात बसले की ईडीचे लोक भाजप कार्यालयात हे शोधण्याची गरज. अनिल परब यांना ईडी नोटीस आली, मात्र ते आज जाणार नाहीत. ईडी काय करतेय, सीबीआय काय करतेय? कुणाला वॉरंट जातंय, कुणाची संपत्ती जप्त होतेय, याची यादी भाजपवाले सोशल मीडियावर टाकत आहेत. ईडी भाजप चालवतेय का भाजपला ईडी चालवतेय?. आम्हाला फक्त डिफेन्सचं रडार माहिती आहे, देशाच्या शत्रूवर हल्ले केले जातात. ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आम्ही असेल तर ते आम्हाला देशाचे दुष्मन मानतात का, लावा रडार आमच्यावर. ठाण्यात फेरीवाल्याने जे केले ते दुर्दैवी आहे, त्यावर कडक कारवाई राज्य सरकार करत आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे, असे संजय राऊत म्हणाले.