भुसावळ प्रतिनिधी : येथील आगाखान वाड परिसरात उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत फिर्यादी तरुण, त्याची पर्न व वडील गंभीर जखमी झाले असून बाजारपेट पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख शेख हसिक उर्फ मुन्ना (वय २८) यांनी जमिना रउफ कुरेश हिच्याकडून ४ हजार रुपये उसने घेतले होते आरोपींनी पैसे परत मागितले असता, शाहरुख यांनी पैसे परत केल्याचे सांगितले. यावरून वाव निर्माण झाला. वाद वाढत गेल्याने संशयित रहिम् रउफ कुरेशी व जमिना रउफ कुरेशी यांनी शाहरुख यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. जमिन कुरेशी हिने लोखंडी पाईपने शाहरुख यांच्या पर्न फरहीन हिच्यावर हल्ला केला. तर रहिम कुरेशी याने लोखंडी वस्तूने मारहाण करत जीवेठार मारण्याच धमकी दिली. या हल्ल्यात शाहरुख, त्यांची पत्न फरहीन तसेच वडील हसिद उर्फ मुन्ना हे गंभीर जखमी झाले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्य मोहसिन शेख यांनाही मारहाण करण्यात आली या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस पारिसकर करीत आहेत.















