जळगाव प्रतिनिधी : लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरुन वाद होवून अकबर खान शेरखान (वय ४९, रा. परकोट मोहल्ला नशिराबाद, ता. जळगाव) यालला पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, फायटर, लाकडी काठीने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. २ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील नशिराबाद येथील परकोट मोहल्ल्यात राहणारे अकबर खान शेरखान (वय ४९) हे पेंटरकाम करणाऱ्यांना दि. २ रोजी लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरुन त्याच परिसरातील काही जणांसोबत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत होवून संशयित अन्वर उल्ला मनियार, जाकर उल्ला मनियार, कलीमउल्ला मनियार, गजाली उल्ला मनियार (सर्व रा. परकोट, नशिराबाद, ता. जळगाव) यांनी लोखंडी रॉडसह फायटर व लाकडी दांडक्याने अकबर खान यांना मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अकबर खान यांनी दि. ६ रोजी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.
















