TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अर्णब गोस्वामी आणखी काही दिवस राहणार कारागृहात

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2020
in कोर्ट, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आणखी काही दिवस कारागृहातच राहावे लागणार आहे. वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडीत मिळाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाची आजची सुनावणी स्थगित करण्यात आलेली असून ९ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

अलिबाग पोलिसांकडून जिल्हा सत्र न्यायालयात तिनही आरोपीची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र सुनावणी स्थगित झाली असून अर्णब गोस्वामींचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान दुसरीकडे अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या अंतरिम जामिनावरील शुक्रवारची सुनावणी अपूर्ण राहिली असून शनिवारी पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. न्यायालयाने शनिवारी सुनावणी ठेवली असली तरी तातडीच्या अंतरिम जामिनाव्यतिरिक्त अन्य मुद्दय़ांबाबत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. परंतु शनिवारीही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही तर ती दिवाळीच्या सुट्टीनंतर घ्यावी लागेल. त्यामुळे सर्व मुद्दय़ांबाबत सुनावणी घ्यायची की केवळ तातडीच्या अंतरिम जामिनावर? अशी विचारणा न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने केली. त्यावेळी न्यायालयाला सोमवारपासून दिवाळीची सुट्टी असल्याने शनिवारी केवळ तातडीच्या अंतरिम जामिनावर सुनावणी घेण्याचे स्पष्ट करण्यात आले.

READ ALSO

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

अर्णब यांच्या वतीने विधिज्ञ हरिश साळवे आणि अ‍ॅड्. आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. ‘‘न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेचच अर्णब यांनी अलिबाग न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने जामिनावरील सुनावणी कधी घ्यायची हे स्पष्ट केलेले नाही. शिवाय गुन्ह्य़ाचे स्वरूप लक्षात घेता प्रकरण सत्र न्यायालयाच्या अखत्यारीत येते. या कायदेशीर अडचणीमुळे अर्ज मागे घेण्यात आला. तसेच थेट उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला’’, असे साळवे यांनी सांगितले.

वास्तविक आधी कनिष्ठ न्यायालय आणि नंतर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यावर उच्च न्यायालयात अर्ज केला जातो. फौजदारी दंडसंहितेच्या कलम ४३९नुसार उच्च न्यायालयाला जामीन देण्याचा अधिकार असल्याचेही साळवे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय फेरतपासासाठी महानगरदंडाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्णब यांची अटक बेकायदा असून त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे, असा युक्तिवाद साळवे यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

तरुणाच्या खून प्रकरणी एकाच परिवारातील पाच जणांना जन्मठेप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुजरातमध्ये भीषण अपघातात ; एकाच परिवारातील १० लोकांचा मृत्यू

November 18, 2020

धरणगावात कालभैरव जयंती निमित्त सामुदायिक श्री भैरव चंडी पाठाचे आयोजन !

November 15, 2022

परदेशात नोकरी मिळविण्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन !

March 27, 2023

धुळे एमआयडीसी अभियंत्याला २५ हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात अटक !

September 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group