मुंबई (वृत्तसंस्था) पोलिसांनी बुधवारी सकाळी अटकेच्या कारवाईदरम्यान आपल्याला मारहाण केल्याची तक्रार रिपब्लिक भारतचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने ही तक्रार फेटाळली आहे.
अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचणीचे आदेश अलिबागच्या सत्र न्यायालयाने दिले होते. या तपासणीनंतर गोस्वामी यांना न्यायालयात हजर करण्यात आलं दरम्यान त्यांनी पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केली होती, यावर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने प्रथमदर्शनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचे दिसत नसल्याचे सांगत न्यायलयाने त्यांची तक्रार फेटाळून लावली. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना कोर्ट परिसरात मोबाईलचा वापर केला. त्यांनी मोबाईलवरुन चित्रीकरण करुन कोर्टाच्या सुनावणीचे थेट प्रसारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीसाठी कोर्टाने त्यांना चांगलेच फटकारले. कोर्टाच्या आवारात मोबाईलच्या वापरला सक्तीने बंदी आहे.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर ‘रिपब्लिक’ने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे. अर्णब गोस्वांमी यांनी १० पोलीस कर्मचारी घरात घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचाही रिपब्लिकचा दावा आहे.