पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) पातोंडा ग्रामपंचायत येथील आरो फ़िल्टरला तीन वर्ष पूर्ण झाल्याने व सुविधा दिल्याने ग्रामपंचायतचे कौतुक केले जात आहे.
अमळनेर तालुक्यात पातोंडा येथील सन २०१८ ला आरो फ़िल्टरचे उद्घाटन माजी सरपंच शितल विनोद पवार यांचे हस्ते करण्यात आले होते. या आरो फ़िल्टर प्लान ग्रामपंचायत मालमत्ता असल्याने अनेक ग्रामस्थ कडून बोलले जात होते की, हा प्लान जास्त दिवस चालू शकत नाही किवा टीकू शकणार नाही. ग्रामपंचायतची वस्तु म्हटली की, सावळ गोंधळ असे होते. परंतु येथील विद्यमान सरपंच शितल पवार, विनोद पवार, ग्रामविकास अधिकारी बि वाय पाटील, आरो फ़िल्टर कर्मचारी बाजीराव पवार यांनी काळजी पूर्वक लक्ष दिल्याने हा प्लान सुरळीत चालू आहे तसेच या कामाची संकल्पना माजी सरपंच सुनिल गुलाबराव पवार यांनी सूचवली होती. त्यांनी ग्रामस्थना स्वच्छ पाणी थड पाणी क्लीन पाणी मिळावे यासाठी नवीन वर्षाची ग्रामस्थना सप्रेम भेट द्यावी म्हणुन जानेवारी २०१८ ला भेट दिली होती.
तसेच या आरो प्लानमध्ये भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून तापी नदी या ठिकाणी ट्यूबेल केले असुन पाणी पुरवठा केला जातो.
















