धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष, पंच मंडळ व समाज बांधवांनी जगद्गुरू तुकोबारायांबाबत बेताल वक्तव्य करण्याऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाणे व तहसील कार्यालयात निवेदन सादर केले.
बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरू तुकोबाराय यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या विकृताला अटक करून त्याच्यावर तत्काळ कार्यवाही करावी तसेच त्यास कठोर शासन व्हावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी सर्व समाज बांधवांनी दिला. या संदर्भात सपोनि जिभाऊ पाटील आणि नायब तहसीलदार लक्ष्मणराव सातपुते यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव महेश्वर पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, ज्येष्ठ संचालक माधवराव पाटील, चुडामण पाटील, दत्तू पाटील, संचालक राजेंद्र पाटील, कैलास पाटील, मोहन पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील, दिनेश पाटील, अशोक पाटील, आनंदराज पाटील, वाल्मीक पाटील, परशुराम पाटील, मंगेश पाटील, जितेंद्र पाटील, गुलाब पाटील, मुरलीधर पाटील, माधवराव पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील, गोकुळ पाटील, राजेंद्र पाटील, मनीष पाटील, सुरेश गुरव, गोपाल पाटील, सुखदेव महाजन, ओंकार महाजन, स्वप्निल चौधरी, रुपेश जाधव, दिनेश भदाणे, विक्रम पाटील व समाजबांधव उपस्थित होते.