मुंबई (वृत्तसंस्था) “मला अटक करा, मला फाशी द्या किंवा मला गोळ्या घाला, मी पुन्हा सांगतो, मैं झुकेगा नहीं साला”, असं रोखठोक ट्विट शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी केलेले ट्विट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे. “शिंदे गँगच्या दीपक केसरकरांकडून मला धमकी देण्यात येत आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे या धमक्यांकडे लक्ष देतील अशी आशा आहे. मिस्टर केसरकर, मला अटक करा, मला फाशी द्या किंवा मला गोळ्या घाला… मी पुन्हा सांगतोय, मैं झुकेगा नहीं साला!” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची धमकी शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी दिली. याचा अर्थ काय? न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे? खोके देऊन त्यांना गुलाम केलें आहे? हुकूशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका” असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जायचंय का? यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रासाठी आणि पक्षासाठी तुरूंगात जाऊ, आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाहीत, तुमच्यासारखे लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही, तुम्ही म्हणजे कायदा नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी दीपक केसरकरांवर पलटवार केला.