TheClearNews.Com
Monday, May 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फिल्मी स्टाईल अगदी सगळं ठरल्यागत…दरोडेखोर बँकेत चालत आले…डोळ्यात स्प्रे मारला ; कर्मचाऱ्यांना बंधक बनविले आणि करोडोंचे दागिने, लाखोंची रोकड लुटून क्षणात पसार झाले !

जाणून घ्या....जळगावच्या बँकेत अवघ्या काही मिनिटात घडलेल्या लुटमारची संपूर्ण थरारक कहाणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील काऊ कोल्हे विद्यालयाजवळ असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत आज (गुरुवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. याबाबत शनिपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यानंतर दरोड्याच्या घटनेचा संपूर्ण थरार समोर आला आहे. दरोडेखोरांनी अवघ्या काही मिनिटात अगदी सगळं ठरल्यागत बँकेत येत साडेतीन कोटींच्या दागिन्यासह १७ लाखांहून अधिकची रोकड फिल्मी स्टाईल लुटून नेली.

काळे हेल्मेट कपडेही काळेच !
बँक व्यवस्थापक राहुल मधुकर महाजन (रा.एम.जे कॉलेजसमोर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज दि. १ जून रोजी ते नेहमी प्रमाणे सकाळी ९.४५ वाजता बँकेत गेले. तेव्हा बँकेचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोकल्या नंतर दरवाजा कोणीतरी उघडला. आत गेल्यानंतर दोन काळे हेल्मेटधारी तसेच काळ्या रंगाचे शर्ट घातलेले इसमांनी दरवाजा मागून येत राहुल महाजन यांना पकडून वॉशरूमकडे मारहाण करीत घेऊन गेले. त्याठिकाणी कॅश इन्चार्ज देवेंद्र नाईक हे बसलेले होते. त्यांच्या तोंडाळा चिगट पट्ट्या बांधलेल्या होत्या. त्यांच्या जवळच हाऊस कीपिंग मनोज सुर्यवंशी व सिक्युरीटी गार्ड यांना देखील तोंडावर चिगटपट्टी बांधून बसवून ठेवलेले होते.

READ ALSO

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

चाकूच्या धाकावर उघडायला लावली कॅश आणि गोल्ड रूम !
अज्ञात दरोडेखोरांनी व्यवस्थापक महाजन यांच्या डोळ्यावर स्प्रे मारुन चाबी-चाबी असे बोलून मारहाण करायला लागले. त्यांनी बॅगेत चावी आहे, असे सांगितले तेव्हा महाजन यांनी बॅगेतून चाबी काढून दरोडेखोरांना दिली. त्यानंतर दोघं दरोडेखोर महाजन यांना कॅश रूमकडे घेवुन गेले. त्या ठिकाणी त्यांनी मनोज सुर्यवंशी यास कॅश रुमकडे आणले. त्यांनी मनोजला चाकूच्या धाक दाखविला. त्यामुळे मनोजने त्यांना कॅश रूम उघडुन दिली. यावेळी महाजन यांनी दोघां दरोडेखोरांपैकी एकाशी झटापटी केली. त्यावेळी त्यांचे डोक्यातील हेल्मेट खाली पडले आणि घडताच त्याने महाजन यांच्या मांडीवर चाकूने वार केले. यावेळी महाजन यांनी मनोजला ओरडून सांगितले की, याला पकड़ याला पकड पण त्याने पकडले नाही. दरोडेखोराने तिजोरीमधून रोकड काढली आणि त्यांने व्यवस्थापक महाजन यांना मारहाण करुन पोटावर चाकू लावत गोल्ड तिजोरी देखील उघडायला लावली.

दोघांनी काळ्या बॅगमध्ये रोकड व सोने टाकले !
दरोडेखोराने गोल्ड तिजोरीमधील सर्व खाते उघडे करण्यास लावत. त्यातील सर्व गोल्ड बॅग काढून घेतल्या. यावेळी त्याचा दुसरा साथिदार सुध्दा त्या रूममध्ये आला आणि त्या दोघांनी काळी बॅगमध्ये कॅश व सोने टाकले. यानंतर दरोडेखोरांपैकी एका जाड इसमाने व्यवस्थापक महाजन यांना इशारा करून त्यांच्या मोटार सायकलची चाबी चाकू लावून बळजबरीने हिसकावून घेतली. तर मनोजला बॉशरूमकडे पाठवून महाजन यांना कॅश रूममध्ये भिंतीकडे तोंड करायला लावुन बसवुन ठेवले. यानंतर कॅश रुम बाहेरुन लावून निघून गेले. संपूर्ण चौकशी अंती दरोडेखोरांनी बँकेचे सुमारे १७ लाख रुपये आणि ३ ते ४ कोटी रुपयाचे सोने लुटून पोबारा केला. दरोदेखोरांचा बँकेत घुसल्यापासून तर रोख रक्कम, दागिने पळवून नेण्यापर्यंतचा थरार अवघ्या काही मिनिटांचा होता. त्यामुळे अगदी सगळं ठरल्यागत हा फिल्मी स्टाईल दरोड्याचा थरार घडल्यामुळे शंकेची पाल चुकचुकत आहे.

दरोडेखोरांच्या शोधार्थ पथक रवाना ; संशयितांची चौकशी सुरु !

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच दोन ते तीन पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रवाना झाली आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार काही संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी करायला देखील सुरुवात केली असल्याचे कळते. दरम्यान, प्लानिंग तसेच कुणाच्या तरी माहिती शिवाय एवढ्या मोठ्या दरोडा घालणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. तर एलसीबीची टीम संशयितांची सर्व बाजूने चौकशी करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
Next Post

खळबळजनक : मधुमेहावरील औषध घेतल्यानंतर थोड्याच वेळात दाम्पत्याचा अचानक मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विधानपरिषद निवडणूक : शेकडो खडसे समर्थक मुंबईकडे रवाना

June 19, 2022

कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, जीव जडला नायब तहसीलदारावर ; पुढे जे घडलं ते भयंकर !

February 21, 2022

सोलापुरात पहिली लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी ; पुरूषाचं महिलेमध्ये रूपांतर

May 28, 2022

मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

July 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group