धरणगाव (प्रतिनिधी) शहरात दोन दिवसांपूर्वी रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान मोटार सायकलचा कट लागल्याच्या कारणामुळे 70 ते 80 लोकांनी भूषण भागवत या तरुणाला मारहाण करत घरावर दगडफेक केली होती. या गुन्ह्यातील दोषींना तात्काळ अटक करा अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड.संजयभाऊ महाजन यांनी केली आहे.
अॅड.संजयभाऊ महाजन यांनी धरणगाव पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकांनी भूषण भागवत या तरुणाला मारहाण करत घरावर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे संबंधित परिवार दहशतीत आहे. परिसरारातील दुकानांच्या सी.सी.टी. व्ही फुटेज संग्रहित करून त्यामध्ये आढळून आलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच यापुढे शहरात अश्याप्रकारे जमाव जमवून हल्ला किंवा वाद निर्माण केल्यास सदरील घटनेतील आरोपींना गृहीत धरण्यात यावे. कारण यातील काही जण मुद्दाम वाद निर्माण करून गावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात. त्यामुळे संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देते वेळी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड.संजयभाऊ महाजन, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास माळी सर, भाजप शहराध्यक्ष दिलीप महाजन,अॅड. कन्हैय्या रायपूरकर, सुनील चौधरी, अनिल महाजन, विशाल पाटील, रवि पाटील, सचिन पाटील, प्रथम सूर्यवंशी हे उपस्थित होते.