धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात २१ सोमवार, रोजी प्रथमच राज राजेश्वर सार्जेश्वर महादेव मंदिर, भोले सरकार मित्र परिवारातर्फे भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाकावड यात्रेत शहर व जिल्ह्यातील असंख्य भाविक सहभागी होणार आहेत. पायी निघत असलेल्या कावड यात्रेदरम्यान सूर्य कन्या तापी मातेचे पूजन, सार्जेश्वर महादेव प्रती स्वरूप मुखोटा अभिषेक व पूजन, कलश व कावड पूजननंतर तापी नदी येथून तीर्थ आणत आज सकाळी पावन पालखी कावड यात्रेसह गावात प्रवेश करेल आणि तेथून नंतर पालखी व कावड यात्रा संपूर्ण शहरात फिरून राज राजेश्वर – सार्जेश्वर महादेव मंदिरात महारुद्र अभिषेक करण्यात येईल. तद्नंतर भंडारा म्हणून प्रत्येक भाविकांनी महाप्रसाद घ्यावा असे आवाहन राहुल रमेश वाघ यांनी केले आहे.