पुणे (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अरुण राठोड याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अरुण राठोड याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अरुण राठोड याची पोलीस आयुक्तालयात चौकशी होण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला आहे. या अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण राठोडची चौकशी करणार आहेत. याप्रकरणी एकूण तीन पथक चौकशी काम करतायत. या अगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आलीय. अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. आकस्मिक मृत्यूचीच नोंद झाली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?
मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून ७ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल १२ ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.