धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओ.बी.सी.विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदावर धरणगाव येथील कार्यकर्ते कॉम्रेड अरविंद देवरे यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केलेली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओ.बी.सी प्रदेशाध्यक्ष, ईश्वर बाळबुधे यांना अभिप्रिती असणारी संघटना बांधण्यासाठी देवरे प्रयत्नशील राहातील असा विश्वास नेमाडे यांनी व्यक्त केला आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यपर्यत पोहचविण्यासाठी आपण बांधील असल्याचे देवरे यांनीही म्हटले आहे. देवरे यांच्या निवडी बद्ल जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे, माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर , माजी आमदार सतीश पाटील, धरणगाव तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष तथा शेतकी संघाचे अध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, ग्रंथालय सेलचे जिल्हा अध्यक्ष मोहन पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, राष्ट्रवादी युवती सभेच्या जिल्हा अध्यक्ष कल्पिता पाटील, तालुका अध्यक्ष धनराज माळी, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, भुषण पाटील, संभाजी कंखरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अरविंद मानकरी, महिला अध्यक्षा कल्पना अहिरे यांच्यासह आदी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.