TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बचत गट हे केवळ बचतीचे नव्हे तर समाजपरिवर्तनाचे शक्तिकेंद्र

vijay waghmare by vijay waghmare
June 23, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) जिथे स्त्री सक्षम आहे, तिथे कुटुंब समृद्ध असतं आणि जिथे कुटुंब समृद्ध आहे तिथे समाज उन्नत होतो. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग स्वीकारला, हेच खरं सशक्तीकरण आहे, आणि त्या सशक्ततेचं प्रतीक म्हणजे ‘बहिणाई मार्ट’,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं.

पाळधी-बांभोरी परिसरातील स्त्री शक्ती महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ‘बहिणाई मार्ट’ या उपक्रमाचं भूमिपूजन पार पडलं. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

या वेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की,
सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. गावागावातल्या घराघरातून उद्योजिका तयार होतील, ही आमची पूर्ण खात्री असून पाळधीच्या मातीतून आता बचत गटांचा स्वतःचा ब्रँड निर्माण व्हावा, उत्पादनातून ओळख तयार व्हावी, महिलांना थेट बाजारपेठ मिळावी हीच आमची अपेक्षा आहे. महिला बचत गटांचे वेळेत कर्जफेडीमुळे बचत गटांचा बँकांमधील विश्वास वाढलेला असून त्यांची बँकांमध्ये पत वाढलेली आहे. आज बचत गट हे केवळ महिलांचे बचतीचे माध्यम राहिले नसून, समाज बदलवण्याचे शक्तिकेंद्र बनले आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी,स्त्री शक्ती हेच खऱ्या अर्थाने बचत गटांचं सामर्थ्य आहे. महिलांना बचतीचे महत्व असून जिद्दीने व्यवसाय वाढवावा , प्रशासनाच्या दृष्टीने बचत गट हे अत्यंत विश्वासू घटक आहेत” असे मत व्यक्त केले.

प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ३० हजार बचत गटांना आतापर्यंत ७५० कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले असून, आगामी काळात दरवर्षी ८०० ते १,००० कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्याचं उद्दिष्ट आहे.

माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी ग्रामसंघाच्या कार्यालयासाठी सहकार्य देण्याची ग्वाही दिली. आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक अरुण पवार यांनी आदिवासी महिलांसाठीच्या योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्री शक्ती महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा उषाबाई पाटील होत्या. प्रारंभी दीपप्रज्वलन व स्वागतगीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक किरण महाजन यांनी केलं. सूत्रसंचालन कृषी सखी आशा पाटील आणि सुवर्णा साळुंखे यांनी, तर आभार प्रदर्शन पुनम पाटील यांनी केलं.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रताप राव पाटील, सरपंच लक्ष्मीताई कोळी, उपसरपंच दिलीप पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, आदिवासीप्रकल्प अधिकारी अरुण पवार, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्र्वर भोई, अनिल कासट, मच्छिंद्र साळुंके, चंदू माळी, दिगंबर सोनवणे, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक, संजय महाजन, समाधान पाटील, तालुका प्रमूख डी. ओ. पाटील, सचिन पवार, रवी चव्हाण सर, विविध बँकांचे मॅनेजर, यांच्यासह पाळधी – बांभोरी प्र. चा. जिल्हा परिषद गटातील बचत गटांच्या महिलांची उपस्थीती ही लक्षणीय होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
Next Post

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात !

June 26, 2022

जळगावातील नवीन बसस्थानकात महिलेच्या पर्समधून ४० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास

January 23, 2025

अहिराणी ओवीगीतातील आंबेडकरी दर्शन…!

September 26, 2020

बाळासाहेबांचे नाव कुणालाही वापरता येणार नाही, शिवसेनेचे निवडणूक आयोगाला पत्र ! 

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group