जळगाव (प्रतिनिधी) पोलिसांनी गाडी अडविल्यावर अनेक जण आमदार, खासदार, मंत्री अशा पद्धतीच्या पुढाऱ्यांना फोन लावून आपले वाहन सोडवून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र याला अपवाद ठरेल आहेत, जिल्हा दुध संघाचे संचालक तथा गिरीशभाऊ महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख.
अरविंद देशमुख हे आकाशवाणी चौकातून जात असतांना आज दुपारी वाहतूक पोलिसांनी त्याची कार थांबवली. त्यानंतर त्यांच्याकडे आवश्यक असणारी कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तीन हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांनी तातडीने दंड ऑनलाईन पद्धतीने भरून टाकला. यावेळी एका पोलिसाने त्यांना ओळखले. परंतु अरविंद देशमुख यांनी दादा तुम्ही आपले कर्तव्य पार पाडत आहात, याचा आनंद असल्याचे सांगितले.
अनेक जण आपल्या पदाची अथवा राजकीय संबंधांची ओळख दाखवत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ज्यांची अनेक मंत्र्यांशी ओळख, स्वत:जवळ मोठे राजकीय दृष्ट्या पद असूनही अरविंद देशमुख यांनी विनम्रपणे दंड भरून पोलिसांना सहकार्य केले. अरविंद देशमुख यांनी दाखविलेला समंजसपणा याचा आदर्श सर्वच छोट्या मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहेत.