गुवाहटी (वृत्तसंस्था) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हेही गुवाहाटीला पोहोचले आहेत. आता जळगाव जिल्ह्यातील चारही आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. दरम्यान एकनाश शिंदे गुहावटीत ज्या हॉटेमध्ये थांबले आहेत. त्या हॉटेमध्ये पाटील पोहचले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद घेत नमस्कार केला. त्यामुळे राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मंत्री गुलाबराव पाटील आज ३ आमदारांसह गुवाहटीमध्ये दाखल झाले आहेत. यात अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित, योगेश कदम यांचा समावेश आहे. गुलाबराव पाटील यांनी तिथे पोहचल्यानंतर एकनाथ शिंदे यांना वाकून आदरार्थाी नमस्कार केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी बोलताना पाटील यांनी उद्या आणखी आमदार गुवाहटीममध्ये पोहचणार असल्याचा दावा केला आहे.
गुलाबराव पाटील यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपण गुवाहटीला जाणार असल्याचे सांगितले होते. माझ्या रक्तात शिवसेना आहे, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. पक्ष बदलणार नाही, मी गुवाहटीला चाललो आहे. राज्यातील बहुतेक मंत्री नेते गेले. जिल्यातील तीन जणही गेले मी एकटा काय करू? असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले होते. शिवसेनेच्या परिस्थितीबाबत बोलतांना ते म्हणाले, कि अत्यंत वाईट परिस्थिती आहे, सर्वच फाटलं आहे. त्यामुळे आता ते साधंणही कठीण आहे. वातावरण पाहून पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायला हवा होता. परंतु आता त्याचीही वेळ निघून गेली आहे. होय पण आपण पक्ष बदलणार नाही, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. शिवसैनिक म्हणूनच कार्य करणार आहोत. कारण शिवसेना, आपल्या रक्तात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.