धरणगाव (प्रतिनिधी) आज राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहे. ही घोषणा करताच समाज बांधवांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी या नात्याने म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.
आरक्षणाच्या घोषणनेनंतरच मराठा समाजाच्या आनंदाला उधाण आलं असून राज्यात एकच जल्लोष सुरू आहे. समाज बांधवांनी यावेळी राज्य सरकारचे आभार मानले. धरणगाव तालुका सकल मराठा समाज बांधवांनी पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत राज्य सरकारचे प्रतिनिधी या नात्याने त्यांचे आभार मानले. यावेळी पी एम पाटील सर, चंदन पाटील, गुलाब मराठे, भीमराज पाटील, वाल्मीक पाटील, नामदेव मराठे, गजानन नाना पाटील, गोपाल पाटील, भैया मराठे, मोठा भाऊ मराठे, दिलीप पाटील, अॅड. संदीप पाटील, दत्तात्रय पाटील, माधवराव बापू, महेश पाटील बुधा मराठे,