जळगाव (प्रतिनिधी) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना विधानसभेत कायदा केला. आयोग नेमला पण दुदैवाने आमचे सरकार गेले आणि महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे हे सरकार आले पण यांच्यात कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नाही. त्यामुळे मराठा समाजाचे हे आरक्षण हुकले आहे. असं म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी टीका केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाजन बोलतांना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना विधानसभेत कायदा केला. आयोग नेमला दुर्दवाने सरकार बदले आम्ही तांत्रिक मुद्यावर हे आरक्षण टिकवून ठेवले होते. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने होती. कोणालाय काय करावे हे माहीत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे वाटत असल्याचे दिसून येत होते.
भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन हे बुधवारी दुपारी जळगावात आलेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आले असतांना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.