सातारा (वृत्तसंस्था) पत्नीशी भांडण झाल्यानंतर स्वतःचं घर जाळताना आजूबाजूची दहा घरंही जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेत सुमारे पन्नास लाख रुपयाहून अधिक किमतीचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडण सुरू होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेंव्हा घरातील सिलेंडरने ही पेट घेतला. नंतर या आगीने रुद्र रूप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला. आणि ही सर्व घरे जळून खाक झाली. या आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रूपयाचे नुकसान झाले असून याबाबत संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली. संबंधित पतीला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जाळणाऱ्या पतीला मात्र ग्रामस्थांनी आगीतून बाहेर काढत चांगला चोप दिला