धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सात वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलचा माजी गुणवंत विद्यार्थी तथा श्री गणेश आॅटो आणि व्हाईट हाऊसचे संचालक विधिज्ज्ञ आशिष बाजपेयी यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अॅड. आशिष हे शाळेचे कर्तव्यनिष्ठ,राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त माजी मुख्याध्यापक तथा एनसीसी मेजर सी.ई. बाजपेयी यांचे चिरंजीव आहेत तर गणेश फुड पॅलेसचे संचालक अवधेश बाजपेयी यांचे बंधू आहेत. या दोघाही भावांनी वडिलांचे सचोटी, शिस्त आणि अनुशासन हे गुण घेवून आपल्या व्यवसायाची भरभराट केली आहे. आशिष यांनी तरूणाईतच संकटाशी सामना करून आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन देऊन व्यवसायाबरोबरच माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक आर.के. सपकाळे, एनसीसी आॅफिसर डी. एस. पाटील, ज्येष्ठ शिक्षक कैलास वाघ, बापू शिरसाठ, उमाकांत बोरसे, डॉ.सौ.वैशाली गालापुरे यांच्यासह शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते. आशिष यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
















