धरणगाव/जळगाव प्रतिनिधी : नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला सून कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. टीका करणाऱ्यांना नेहमीच कामाच्या माध्यमातून उत्तर देत असतो. जलजीवन मिशन अंतर्गत 4.32 कोटीची मंजूर पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून त्यासाठी ग्रामस्थांचाही सहकार्य असू द्या, ग्रामपंचयाती जवळील लहान पुलाचे काम नाबार्ड मधून मंजूर करणार असून स्मशान भूमीलगत शेत रस्त्याचा काम , तसेच साळवा ते पष्टाने रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असून साळवा व परिसराचा विकासाचा बॅकलॉगभरून काढणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलांबरवपाटील यांनी केले. ते दिवाळीच्या मूहर्तावर साळवा येथे झेंडा चौक येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. 35 वर्ष सतत संघर्षकरून शिवसेना वाढीसाठी काम केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ध्येय व धोरणे टिकविण्यासाठी आम्ही उठाव केला असून मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व जोपासण्यासाठी आम्ही कटी बद्ध असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ना.गुलाबराव पाटील यांनी विरोधक व टिका करणाऱ्यांवरही तूफान फटाके बाजी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येवून अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण केले. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ देऊन पालकमंत्री गुलांबराव पाटील यांचे स्वागत केले. नांदेड – साळवा या जिल्हा परिषद गटातील नागरीकांसाठी विविध योजनांचा लाभ व विकास कामांची माहिती आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी साळवा येथे बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उदघाटन शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यालयात जास्तीती जास्त गरजवंतांचे प्रश्न सोडवून हे कार्यालय न्यायमंदीर व्हावे अशी अपेक्षाही ना.गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच ईशाताई बोरोले, ग्रा.प.सदस्य योगिनी नारखेडे, प्रिया इंगळे, जयश्री इंगळे, रजनी बोरोले, उपतालुका प्रमुख मोतीआप्पा पाटील, माजी उपसभापती डि. ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे , प्रेमराज पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, प्रमोदबापू पाटील, यांच्यासह भजनी मंडळ व परीसरातील सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदेव पाटील, राजेश वाणी , योगराज ढाके, जीवन वाणी, दिलीप पाटील, लोटन पाटील, किशोर इंगळे, किशोर बोरोले, पंढरी इंगळे, योगराज कोल्हे, हेमंत नारखेडे यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पी. एम. पाटील सर यांनी मानले. तर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते कुणाल इंगळे यांनी केले होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितेंद्र पवार, दिपक कोल्हे, मयूर नेहेते, निलेश ढाके, ललित खडसे यांच्यासह युवक व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या कामांचा झाला शुभारंभ !
साळवा येथे 4 कोटी 32 लाखाची पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, साळवा – रोटवद या 1.5 किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 80 लक्ष निधी मंजूर असून त्या रस्त्याचा शुभारंभ देखील करण्यात आला. मूलभूत सुविधा योजनेतर्गत (2515)13 लक्ष निधी खर्च करून बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालायचे लोकार्पण व 6 लक्ष निधीतून कॉक्रिटीकरण , 5 लक्ष आमदार मधून रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे अश्या एकूण 5 कोटी 36 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे विधिवत पूजन करून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर साळावा- नांदेड जिल्हा परिषद गटांसाठी बाळासाहेबांची शिवसेना मार्फत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजनेंचा लाभ पोहचविण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी साळवा येथे नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलांबरव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत साळवा ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.