एरंडोल (प्रतिनिधी) माझ्याशी लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करुन तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल, अशी धमकी देऊन १७ वर्षीय मुलीवर औरंगाबाद येथे नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. बेपत्ता असलेली तरुणी व एक युवक औरंगाबाद येथील जोगेश्वरी नगरात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. एरंडोल पोलिसांचे पथक औरंगाबाद येथे गेले असता त्यांना पीडीत युवती व संशयित दिनेश बाबूलाल पवार आढळले. त्यावेळी पीडीतेने पोलिसांना आपबिती सांगितली. ३ रोजी संशयिताने पीडीतेस धमकावून औरंगाबाद येथे नेले. जोगेश्वरी नगरात भाड्याने खोली घेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. संशयित पवारविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश आहिरे तपास करत आहेत.