TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसे यांच्यावरील ईडी चौकशीचा मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2021
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (वृत्तसंस्था) गेल्या आठवड्यापासून माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांची व त्यांच्या कुटुंबियांची भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी ईडी या तपास यंत्रणेमार्फत चौकशी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ते तहसील कार्यालय मोर्चा काढून मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन देऊन ही चौकशी सूडबुद्धीने करण्यात असल्या कारणाने या चौकशीचा निषेध व्यक्त करण्यात आलाय.

दरम्यान, हा प्रकार थांबला नाही तर आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

READ ALSO

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विधिमंडळामध्ये व वर्तमानपत्राच्या माध्यमातून धमक्या देणे सुरू आहे. केंद्रातील सरकारच्या व महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांच्या विरोधात बोलले की, ईडी ची धमकी दिली जाते. विनाकारण नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. ईडी सारख्या स्वायत्त संस्थेचा वापर राजकीय स्वरूपात होतोय. ईडी च्या माध्यमातून असे भासवले जात आहे की, तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात किंवा महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बोलू नका, भ्रष्टाचारावर बोलू नका, सरळ सरळ असे वाटते की ईडीचा वापर भाजपाच्या कार्यालयातून होतोय. या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना अशाच प्रकारे नाहक त्रास दिला जातोय. वास्तविक पाहता भोसरी येथील जमिनीच्या संदर्भात नाथाभाऊ यांनी वारंवार सांगितले आहे की, ही जमीन एम.आय.डी.सी. ची नाही, सरकारची नाही, कोणत्याही प्रकारची भूसंपादनाची प्रक्रिया झालेली नाही. अथवा मूळ मालकाला जमिनी बाबतचा मोबदला सुद्धा दिलेला नाही. ही जागा एमआयडीसीचा ताब्यात नाही. त्यामुळे हा व्यवहार संपूर्णपणे खाजगी स्वरुपाचा आहे .सरकारचे या व्यवहारामुळे काहीही नुकसान झालेले नाही. हा व्यवहार सौ.मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांच्या नावाने असून तो अधिकृत आहे. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी सुद्धा रीतसर भरलेली आहे.

एकनाथराव खडसे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही त्यांच्या नावाने व्यवहार झालेला नाही. असे असताना जाणीवपूर्वक ईडी कडून त्यांना बोलावण्याचा प्रश्न च काय ? वास्तविक पाहता या प्रकरणाचे २०१६ पासून पाच वेळा चौकशी झालेली आहे. न्यायमूर्ती झोटिंग कमेटी, बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे, आयकर विभाग, अँटी करप्शन ब्युरो (ACB)कडून चौकशी होऊन एसीबी मार्फत क्लोजर रिपोर्ट पुणे कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. या चौकशीत कोणतेही तथ्य आढळलेले नाही. परंतु एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तात्काळ ईडी कडून चौकशी सुरू झाली. यामध्ये राजकीय वास असल्याचे दिसून येते. यापूर्वी अनेक वेळ चौकशा होऊन सुद्धा पुन्हा ईडीची चौकशी होते याचा अर्थ असा निघतो की, राजकीय दबावातून ईडी कार्य करीत आहे. भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का नाही ? असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. खडसे कुटुंबीयांना ज्या पद्धतीने छळले जातेय त्याचा आम्ही धिक्कार करतो. एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना खोट्या भोसरी जमीन प्रकरणात मुद्दाम गोवण्याचा प्रयत्न होत आहे. असा आमचा आरोप आहे.

महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात एकनाथराव खडसे यांना मानणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्यांची राजकीय व सामाजिक ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची पायाखालची वाळू घसरू लागल्याने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबियांवर कुरघोडी करण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केलेला असून सदर प्रकार तात्काळ थांबवून त्यांचा मानसिक छळ थांबवावा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, प स सभापती सुवर्णा ताई साळुंखे, प्रवक्ता सेल रावेर लोकसभा प्रमुख विशाल महाराज खोले, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, माजी प स सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष शाहीद खान, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना कांडेलकर, राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्ष निता पाटील, नंदा निकम, किशोर चौधरी, माफदा तालुका अध्यक्ष राम पाटील, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, सरचिटणीस रवींद्र दांडगे, कल्याण पाटील, डॉ. बि सी महाजन, भागवत पाटील, चंद्रकांत बढे, लिलाधार पाटील, समाधान कार्ले, संदिप जावळे, रणजित गोयनका, शिवाभाऊ पाटील, कैलास पाटील, साहेबराव पाटील, गजानन पाटील, रउफ खान, विकास पाटील, राजेश ढोले, मुन्ना बोडे, प्रविण दामोदरे, निलेश खोसे, अनिल पाटील, बापु ससाणे, प्रविण पाटील, वासुदेव बढे, प्रेमचंद बढे, विजय भंगाळे, सुनिल काटे, सुनिल पाटील, राजेंद्र पाटील, शेषराव पाटील, अप्पा नाईक, सुरेश हिरोळे, दिपक साळुंखे, मधुकर गोसावी, सदाशिव तायडे, ज्ञानदेव मांडो कार, अरूणाबाई पवार अक्काबाई भोसले, जोगिंदर भोसले अंबादास पाटील, रवी पाटील, गजानन खिराळकर, रमेश खिरळकर, पुंडलिक कपले, संतोष कांडेलकर, प्रदीप पुरी गोसावी, आशिष हीरोळे, कचरू बढे, अनंता कांडेलकर, समाधान पाटील, योगेश पाटील, राजेश पाटील, धनराज कांडेलकर, छगन राठोड, संतोष पाटील, सोपान कोळी, हनिफ भाई, बाळा सोनवणे, सोपान कांडेलकर, उमेश बोबंटकर, राजेश बोरसे, नितेश राठोड, सदानंद भोसले, भैया कांडेलकर, मयूर साठे, अजय आढायके, पवन चौधरी, गजानन वंजारी, पंजाब राव पाटील, रमेश सुरवाडे आणि असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
Next Post

धरणगाव येथे RMBKS - प्रोटानतर्फे धरणे आंदोलन, व घंटानाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रशिक्षण होऊनही प्रमाणपत्र नाही ; शिक्षक सहा महिन्यापासून प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत !

June 28, 2024

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ७ जानेवारी २०२५ !

January 7, 2025

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थीतीत उद्या बैठक

September 9, 2020

चोपडा तालुका व्यापारी महामंडळाची कार्यकारणीची बिनविरोध निवड !

July 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group