भुसावळ (प्रतिनिधी) येथील गडकरी नगरातील रहिवासी असणार्या एका तरूणावर रात्री चाकूने प्राणघातक हल्ला झालाय. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर चाकूने वार करून पैसे व मोबाईल हँडसेट घेऊन पळ काढला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील गडकरी नगरातील रहिवासी असणारा शुभम दिलीप खत्री हा तरूण रात्री अकराच्या सुमारास घरी येत असतांना मागून वेगाने आलेल्या दुचाकीने त्याला टक्कर मारली. यामुळे तो खाली पडला. यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर चाकूने वार करून पैसे व मोबाईल हँडसेट घेऊन पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शुभम दिलीप खत्री याला डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.