धानोरा ता.चोपडा (प्रतिनिधी) येथून जवळच सुटकार येथे किरकोळ वादातून एकावर धारधार गुप्तीने वार करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईश्वर हरी ठाकरे (वय-३१ रा. सुटकार) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अरुण दामू सोनवणे, अश्विन विनोद सोनवणे, जयेश अरुण सोनवणे (सर्व. रा. सुटकार ता. चोपडा) या तिघांनी किरकोळ वादातून ईश्वर ठाकरे यांचे चुलत भाऊ गणेश भास्कर ठाकरे याला जिवेठार मारण्याचा उद्देश्याने लाकडी दांडके, लोखंडी आसारीसह धारधार गुप्तीने हल्ला चढवला. तसेच अरुण सोनवणे, अश्विन सोनवणे हे दोघं गावात व गल्लीत किरकोळ कारणावरून भांडण करुन गुंडागर्दी करुन लोकांना दहशत निर्माण करीत असल्याचेही ठाकरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि गणेश बुआ हे करीत आहेत.