भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील देव्हारी येथील एका हळदीच्या कार्यक्रमात गैर कायद्याची मंडळी जमवून तरुणाच्या मानेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. तसेच हळदीच्या मंडपातील खुर्च्या फेकून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात पाच जणांसह अनोळखी २० ते २५ पुरुष व महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात आरती ज्ञानेश्वर बरडे (वय २० रा. डोंगर खंडळा बोराळा ता. चिखली जि. बुलढाणा ह. मु चिंचोल चौक गांधी शाळेजवळ बुलढाणा) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ जून २०२२ रोजी अनिल नवल सोनवणे, सुखदेव उर्फ अप्पा देवराम सोनवणे, समाधान देवराम सोनवणे, दिलीप रतन गायकवाड सर्व रा. देव्हारी ता. भडगाव), योगेश प्रकाश सोनवणे यांच्या सह अनोळखी २० ते २५ पुरुष व महिला अशांनी आरती व तिचे होणारे पती समाधान विनायक पाटील यांच्या लग्नाचे हळदीचे कार्यक्रमातील देव नाचविण्याच्या कार्यक्रमात येत गैर कायदयाची मंडळी जमवली. तसेच आरती हिला तिच्या जाती बाबत विचारपूस करुन आरतीचे होणारे पती समाधान विनायक पाटील याला अनिल नवल सोनवणे याने मारुन टाकण्याच्या इरादयाने समाधान याच्या मानेवर वार केला. तसेच आरतीचे पती समाधानच्या घरात घुसून मंडपातील खुर्च्या अस्ताव्यस्त फेकुन दिल्या. यावेळी पोलिसांनी आरती व तिच्या होणाऱ्या पाटील मारहाण करणाऱ्या लोकांपासून वाचवण्यासाठी पोलीस गाडीत बसवीत असताना पोलिसांच्या गादीवर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.