अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरात येथे दोन ट्रकच्या भीषण अपघात झाला असून या धडकेत ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. ही घटना गुजरातमधील बडोदा येथील वाघोडिया क्रासिंग हायवेवर आज(बुधवार) पहाटे घडली आहे.
अपघातामधी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या दुर्घटनेबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ”बडोदा जवळ रस्ते अपघातामुळे मृत्यू झाल्याचे ऐकून दुःख होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जी लोकं जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत. तसेच, मृत्यू झालेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो.” तर, गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील कोठारिया गावाजवळ आज सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण ढळल्याने, चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचेही समोर आले आहे.