नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार माजवला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये भूकंप झाला. भूकंपाचे हे धक्के पाकिस्तानातही जाणवले. पहाटेच्या भूकंपात 250 जखमी असून 155 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी पहाटे 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप इतकी होती. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात होता. भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर 7.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक आहे. अफगाणिस्तानातील भूकंप यापेक्षा कमी तीव्रतेचा होता.भूकंपामुळे घराचे छत कोसळले, त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा भूकंप पाकिस्तानी वेळेनुसार पहाटे 1.54 वाजता झाला. देशाच्या पूर्व प्रांतात आलेल्या या जबर भुकंपात 155 जणांना जीव गमवावा लागला आहे.
इस्लामाबादसह इतर शहरांमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. सोशल मीडियावरही लोक भूकंपाबद्दल बोलत आहेत. भूकंपाचे हे धक्के काही सेकंदांसाठी जाणवले. मात्र यामुळे लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. यापूर्वी शुक्रवारीही पाकिस्तानात भूकंप झाला होता. त्यानंतर इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्ये हे धक्के जाणवले. फैसलाबाद, अबोटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलकांडी येथेही हे धक्के जाणवले आहे.