TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा !

खान्देशात साडेतेरा लाख ग्राहक घेताहेत लाभ

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळवण्यासाठी जळगाव परिमंडलातील जवळपास साडेतेरा लाख ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

जळगाव परिमंडलातील 16 लाख 53 हजार 418 वीजग्राहकांपैकी 13 लाख 33 हजार 302 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर या वर्गवारीतील 13 लाख 4 हजार 550 ग्राहकांपैकी 10 लाख 91 हजार 830 ग्राहकांचा तर कृषिपंप वर्गवारीतील 3 लाख 48 हजार 868 ग्राहकांपैकी 2 लाख 41 हजार 472 ग्राहकांचा समावेश आहे. जळगाव मंडलात 9 लाख 64 हजार 144 वीजग्राहकांपैकी 8 लाख 36 हजार 923 ग्राहकांनी, धुळे मंडलात 4 लाख 42 हजार 518 वीजग्राहकांपैकी 3 लाख 43 हजार 788 ग्राहकांनी, तर नंदुरबार मंडलात 2 लाख 46 हजार 756 वीजग्राहकांपैकी 1 लाख 52 हजार 591 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख ही माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येत आहे. परिमंडलातील 84 टक्के घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक बदलायचा आहे, अशा ग्राहकांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा अशा ग्राहकांनी 24 तास सुरू असणाऱ्या 1912 किंवा 1800-102-3435 व 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकांवर, https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अ‍ॅपवर नोंदणी करावी. परिमंडलातील 1 लाख 7 हजार 396 कृषिपंपधारक ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक नोंदवलेले नाहीत. वीजबिलाचा तपशील व इतर माहिती मिळवण्यासाठी या ग्राहकांनीही आपले क्रमांक वरील पद्धतीने नोंदवण्याचे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना निधी देऊन आमदारांनी केली शब्दपूर्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

MSEB कार्यालय शेजारील झोपडपट्टी बनली अवैध दारू, गांजासह पत्त्याचा अड्डा

March 7, 2025

जळगाव : भंगाळे गोल्डच्या कारागिराने १४ लाखांची केली फसवणूक ; शनिपेठ पोलिसात गुन्हा

June 6, 2022

आपदग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : ना. गुलाबराव पाटील

January 18, 2024

जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार : अदर पुनावाला

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group