जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ९५ हजार ९५८ कोरोना बाधीत रुग्णांपैकी ८२ हजार ६०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११ हजार ६२६ रुग्णांवर उपचार सुरु असून १ हजार ७१२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
तालुकानिहाय उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण
सध्या जळगाव शहरात २५०७, जळगाव ग्रामीणमध्ये ३७६, भुसावळ १०००, अमळनेर ८३४, चोपडा २५६०, पाचोरा ३५०, भडगाव ४२५, धणगाव ५०४, यावल ४६९, एरंडोल ४०३, जामनेर ४७१, रावेर ३९०, पारोळा २३८, चाळीसगाव ४७४, मुक्ताईनगर ३०८, बोदवड २६५, इतर जिल्ह्यातील ७२ असे एकूण ११ हजार ६४६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ११ हजार ६४६ रुग्णांपैकी ९ हजार २५ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. तर २ हजार ६२१ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. बाधित असलेल्या रुग्णांपैकी ७ हजार ७९६ रुग्ण हे गृह अलगीकरणात असून ५२० रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहे. तर कोविड केअर सेंटर मध्ये १२२९, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर मध्ये १७९३ तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ८२८ रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी १३१२ रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून ५५७ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
तालुकानिहाय मृत्यु संख्या
आतापर्यंत जळगाव शहरात ४०८, जळगाव ग्रामीणमध्ये ९४, भुसावळ २४९, अमळनेर ११६, चोपडा ११९, पाचोरा ८१, भडगाव ५०, धरणगाव ७६, यावल ८३, एरंडोल ६०, जामनेर ८६, रावेर ११३, पारोळा २६, चाळीसगाव ८७, मुक्ताईनगर ४२, बोदवड २२ असे एकूण १ हजार ७१२ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.