नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक तरुण भर लग्नात नवरीच्या मैत्रीणीसोबत अश्लील चाळे करत होता. (Groom sex with bride Close Friend) परंतु त्याला नवरीने चांगलीच अद्दल घडवली. भर मांडवात उघडा करून त्याची धिंड काढली.
गाडीमध्ये सुरु होता भलताच प्रकार
लग्नसोहळा सुरु होता. लग्न हे ख्रिश्चन पद्धतीचं होतं. त्यामुळे नवरी मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत चर्चमध्ये आली होती. पण नवऱ्याचा काही पत्ताच नव्हता. त्याला फोन करण्यात आले, पण त्याचा फोन काही लागत नव्हता. तेवढ्यात कोणीतरी नवऱ्याची गाडी चर्चपर्यंत पोहोचल्याची वर्दी दिली. त्यामुळे आपल्या नवऱ्याला पाहण्यासाठी उत्सुक असलेली नववधु गाडीजवळ धावत गेली. पण या गाडीमध्ये भलताच प्रकार सुरु होता. नवरदेव चक्क नवरीच्या मैत्रीणीसोबत अश्लील चाळे करत होता. नवरा सेक्स करण्यात इतका गुंग झाला की त्याची गाडी मांडवात पोहोचली आहे. याचं भानं देखील त्याला नव्हतं.
नवरी रडून रडून अक्षरश: हैराण
लक्षवेधी बाब म्हणजे त्याचे हे अश्लील चाळे सर्वजण गाडीच्या काचेमधून पाहात होते. अन् मग एकच गोंधळ उडाला. नवरी रडून रडून अक्षरश: हैराण झाली. तिने आपल्या हातांनीच गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न केला. हा आक्रोश पाहून मग नवरदेव देखील घाबरला. अन् कपड्यांशिवायच तो आणि मैत्रीण वाट मिळेल तिथे पळू लागले. नवरीने आणि तिच्या मित्र-मंडळीने त्याला बडवण्यासाठी पाठलाग केला. परंतु कोणाच्याही हातात लागण्याआधी त्यांनी तिथून धूम ठोकली. हा सर्व प्रकार तेथील उपस्थित लोकांनी कॅमेऱ्यात कैद केला. अन् हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गाडीची नंबर प्लेट पाहता हा धक्कादायक प्रकार युरोपमध्ये घडला असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु या जोडप्याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून भारतीय प्रेक्षकांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे.