धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका तरूणावर लैंगिक अत्याचार कायदा व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री ८ वाजता झोपले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी देखील झोपलेली होती. रात्री ९ वाजता पिडीत मुलगी लघुशंकेसाठी उठली असता त्यांच्या गल्लीतील संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून ओढत नेत एका घरात तिच्यावर अत्याचार केला. दुसरीकडे मुलगी घरात नसल्यामुळे आई चितेंत होती. मध्यरात्री १२.३० वाजता पिडीत मुलगी घरी आल्यावर तिने सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी मंगळवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याच्यावर लैंगिक अत्याचार कायदा व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा फरार आहे. पुढील तपास पोहेकॉ अमोल गुंजाळ करीत आहे. दरम्यान, सहा वर्षापुर्वी अल्पवयीन मुलीच्या वडीलांचे निधन झाले आहे.