रावेर (प्रतिनिधी) दोधे येथील एका २३ वर्षीय युवतीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन अत्याचार केल्याप्रकरणी खानपुर येथील सेट्रल बँक आँफ इंडियाचा शाखा व्यवस्थापका विरोधात रावेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी सेट्रल बँक आँफ इंडियाचा शाखा व्यवस्थापक नितीन यशवंत शेंडे यांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन जवळीक साधली आणि शारीरीक संबध प्रस्थापित केले. यासंदर्भात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील पोउनि अनिस शेख पोउनि मनोहर जाधव तपास करीत आहेत.