जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयात घरफोडी, दुकान फोडीचे व अॅल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे. शेख शकिल शेख सलीम (रा. पंचशिल नगर, भुसावळ) व शेख आसिफ शेख अकबर (रा. मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ), असे अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना दि.२४ नोव्हेंबर रोजी शेख शकिल शेख सलीम व शेख आसिफ शेख अकबर यांनी यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी केल्याची खात्री लायक बातमी मिळाली होती. त्यानुसार पोउनि. अमोल देवढे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, अशरफ शेख निजामोद्दीन, दिपक शांताराम पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पोकॉ विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, पोकॉ मुरलीधर सखाराम बारी यांचे एक पथक तयार करुन त्यांना भुसावळ येथे रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील संशयीतांचा भुसावळ शहरता शोध घेतला असता शहरातील बस स्टॅण्ड जवळील रिक्षा स्टॉप जवळ शेख शकिल शेख सलीम व शेख आसिफ शेख अकबर हे दोघं मिळून आलेत. त्यांना विचारपुस केली असता त्यांनी यावल पो.स्टे. ला CCTNS नं. ४४९ / २०२२ भादंवि क. ४५४,४५७, ३८०, पहूर पो.स्टे. CCTNS नं. ३६४ / २०२२ भादंवि क.३८०,४६१ आणि एमआयडीसी पो.स्टे. CCTNS नं. ७३४ /२०२१ भादंवि क. ३७९ हे गुन्हे केल्याची कबुली दिली.
एवढेच नव्हे तर या गुन्ह्यात त्यांच्या सोबत त्यांचे साथीदार वसिम अहमद पिंजारी (रा. पंचशिल नगर, भुसावळ), चॅम्पीयन श्याम इंगळे (रा. पंचशिल नगर, भुसावळ), श्याम सुभाष शिरसाट ऊर्फ अब्दुल गफ्फर (रा. पापा नगर, भुसावळ), आवेश अहमद पिंजारी (रा. पंचशिल नगर, भुसावळ) हे सुध्दा असल्याचे कबुल केले आहे. संशयित आरोपी शेख शकिल शेख सलीम व शेख आसिफ शेख अकबर यांना यावल पोलिसांच्या ताब्यात पुढील तपास कामी ताब्यात दिले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघं संशयीतांना कडून ३ गुन्हे उघडकिस आणून चांगली कामगिरी केलेली आहे. तसेच इतर निष्पन्न आरोपी मिळाल्यावर त्यांचे कडून अजुन बरेच घरफोडी व दुकान फोडीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.