TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचंय – नितेश राणेंनी केली टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून आई आणि मुलाचे सरकार हटवले. त्याचप्रमाणे आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचे आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेने केवळ मोठमोठी टेंडर मंजूर केली. प्रत्यक्षात मात्र काहीच घडले नाही. उद्धव ठाकरे आपण लोकप्रियतेच्याबाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असल्याचा दावा करत होते. पण कोरोनाच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. अगदी दाऊदची धमकी आली तरी ते घरातच बसून राहिले, अशा शब्दांत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविली.

भाजप आमदार सुनील राणे यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी बोरिवली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष मंगलप्रात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार नितेश राणे, आमदार योगेश सागर आणि भाजपचे अन्य नेते उपस्थितीत होते. यावेळी नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नितेश यांनी आदित्य ठाकरे यांना बेबी पेंग्विन संबोधत त्यांची खिल्ली उडविली. तसेच मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावरही टीका केली. कोरोनाच्या काळात पालिकेने केवळ मोठमोठ्या रकमेची टेंडर मंजूर करवून घेतली. यानंतर प्रत्यक्षात काहीच घडले नाही. त्यामुळे येणार्‍या काळात मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार झाले पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

तर आमदार योगेश सागर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप शिवसेनेशी युती करणार नाही, असे सांगितले. पूर्वी आम्हाला शिवसेना अत्यंत ताकदवान पक्ष आहे, असे वाटत होते. परंतु, स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यानंतर आम्हीच शिवसेनेपेक्षा शक्तिशाली आहोत, हे आमच्या लक्षात आल्याचे योगेश सागर यांनी सांगितले. याशिवाय, बोरीवली मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनीही पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. पालिकेच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले जाणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने आरोग्य क्षेत्रासाठी किती तरतूद केलेय, याची माहिती समोर आली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेने शिक्षण क्षेत्रासाठी साडेतीन हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र, हे पैसे खर्च झालेच नाहीत, असा आरोप आमदार सुनील राणे यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार रुग्णालयात दाखल ;कोरोनाची झाली लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करा ; बंगळुरूच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

December 18, 2021

आजपासून भाऊंच्या उद्यानात ‘मैत्र महोत्सव’!

January 1, 2026

बेळगावमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा कट ; संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप !

November 29, 2022

राज्याला गुटखा पुरवणारी टोळी चाळीसगावात कार्यरत, पोलीसांची भूमिका संशयास्पद : आ. चव्हाण (व्हिडीओ)

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group