पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या एकलग्न येथे असलेल्या वनजमिनीवर शेती करण्याच्या उद्देशाने अतिक्रमण करण्याचा तयारीत असलेल्या एका विरोधात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथून जवळच असलेल्या एकलग्न येथे असलेल्या शासकीय वनजमिनीवर ९ ते १० लोक झाडे तोडून शेती करण्याच्या उद्देशाने जमीन तयार करण्याचा प्रयत्न करत होते. या वेळी तेथे असलेल्या वनरक्षक सुरेखा सुभाष पिंपळे यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यास दाद दिली नाही, म्हणून त्यांनी पाळधी पोलीस चौकीत संपर्क करून मदत मागितली. या वेळी स.पो.नि. सचिन शिरसाठ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह धाव घेतली. तेव्हा तेथे जमाव जमला होता. ही परिस्थिती पाहून त्यांनी त्यांची समजूत काढली व त्यांना शांत केले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
याबाबत वनरक्षक सुरेखा सुभाष पिंपळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भास्कर साहेबराव वाघ यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचातपास पो. नि. उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. सचिन शिरसाठ व त्यांचे सहकारी करत आहेत.