जळगाव (प्रतिनिधी) विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्राण वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले आहे. काल सायंकाळी ही घटना घडली आहे. ही घटना जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया जवळच्या विद्युत रोहित्राजवळ घडली आहे.
विद्युत रोहीत्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव कैलास भांगे (वय – ४०, रा. यवतमाळ) आहे. अत्यंत विमनस्क अवस्थेत तो बराच वेळ रोहित्राजवळ उभा असल्याचे लक्षात आले. या चौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनी त्याचा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे लक्षात आले. त्यानंतर लगेच वीज पुरवठा खंडित करून पोलिसांनी त्याचा रोहित्रातील हात काढला. त्याला नंतर वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले आणि जिल्हा पेठ पोलिसांना याबाबत ची माहिती दिली.