हरदा (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशात हरदा इथल्या रहटगाव पोलीस ठाणे क्षेत्रात एका नराधम सासऱ्यानं थेट आपल्या सुनेवरच बलात्कार केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रकरणात ही पीडिता गर्भवती आहे. याप्रकरणी पीडितेच्या माहेरच्या लोकांनी जवळच्या चिचोली ठाण्यात सासरा, पती यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यासंबंधात माहिती देताना एएसआय संतोष रघुवंशी यांनी सांगितलं, की हा आरोपी सासरा चिचोली ठाणे क्षेत्रात कचनार भागातील जंगलात आपल्या कुटुंबासह राहतो. त्याचा मुलगा गुरुचरणच्या पत्नीवर त्याची वाईट नजर पडली. सासऱ्यानं गुरुचरणच्या पत्नीवर १ ऑगस्ट २०१९ पासून ३ फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान अत्याचार केला. हे खूप काळापासून सुरू होतं. पीडितेनं ही गोष्ट अत्यंत व्यथित मनानं आपला पती आणि सासरच्यांना सांगितली तेव्हा त्यांनी मदत करण्याऐवजी तिलाच धमकावलं. तोंड न उघडण्याबाबत सक्त ताकीद दिली. या प्रकारामुळं पीडिता प्रचंड घाबरली. तिनं कसाबसा माहेरच्या लोकांशी संपर्क साधला. झालेला प्रकार त्यांना घाबरतच सांगितला. यानंतर माहेरचे लोक प्रचंड संतापले. त्यांनी जवळच्या चिचोली ठाण्यात सासरा, पती यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. चिचोली पोलीस ठाण्यानं गुन्हा दाखल करत हे प्रकरण रहटगाव ठाण्याला पाठवून दिलं आहे.