भुसावळ (प्रतिनिधी) देशभरातील रामभक्त वाट पाहात असलेला क्षण आता काही दिवसांवर आलेला आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकांचं वाटप सुरू आहे. त्याचप्रकारे वरणगाव येथील वासुदेव नेत्रालायाने रुग्णांना देण्यात येणाऱ्या प्रिस्क्रिप्शनवर (औषधी उपचार पत्रक) अयोध्येती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पत्रिकेची छपाई करुन वितरण सुरु केले आहे.
वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. .रेणुका पाटील आणि डॉ. नी. तू. पाटील हे नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रसेर असतात. रुग्ण तपासणी झाल्यावर डॉक्टर औषधीं उपचार पत्रिका देतात त्याची दुसरी बाजू हि कोरी असते. डॉ. पाटील यांनी त्या कोऱ्या बाजूवर श्री रामजन्मभूमी तीर्थाषेत्र यांनी जगभरातील रामभक्तांना जे निवेदन केले आहे ते छापले आहे. २२ जानेवारी २०२४ या शुभ दिनी सर्वांनी आपल्या गावात,परिसरात,भजन कीर्तन करावे आणि आनंदोत्सव साजरा करावा.तसेच संध्याकाळी घरोघरी दीपोत्सव साजरा करावा असा मजकूर छापला असून वासुदेव नेत्रालय आता ते प्रत्येक रुग्णांना वाटप करत असून जनजागृती करत आहेत. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते पत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष युवराज लोणारी आदि उपस्थित होते.
यापूर्वीही प्रिस्क्रीप्शनमधून जागृती !
वासुदेव नेत्रालयाचे डॉ. नी. तू. पाटील यांनी यापूर्वीही प्रिस्क्रिप्शनमधून जल हि जीवन है, अवयव दान –श्रेष्ठ दान, आता फुलराणी जळणार नाही तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, भारत सरकार यांचे शेतकरी बंधूना आवाहन असे उपक्रम याच पद्धतीने राबविले आहेत. यानंतर आता ऐतिहासिक श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे निमंत्रण प्रकाशीत करुन सामाजिकता जोपासली आहे.















