कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल पोलीस स्टेशनला आरोपी शांताराम तुकाराम चौधरी (रा. जहांगीर पुरा एरंडोल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याकामी चौधरी यास एरंडोल प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी सदर जामीन मिळणेकामी आरोपीचे वकील अॅड. दिनकर डी. पाटील दाखल केलेले विविध मार्गदर्शक न्यायनिवाडे युक्तिवाद विचारात घेऊन सदर आरोपी चौधरी यांची अटी व शर्ती वर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सदर आरोपी तर्फे जामीन कामी अॅड. दिनकर पाटील यांनी कामकाज पाहिले अॅड. अजिंक्य ए काळे यांनी सहकार्य केले. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एरंडोल यांनी भादवि कलम ३५३ मध्ये दिलेला निर्णय हा पहिला व जिल्ह्यातील ऐतिहासिक निर्णय असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.