धरणगाव (प्रतिनिधी) येथील भवरलाल भाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय येथे बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र ग्रंथालय सेना प्रदेश उपप्रमुख व वाचनालयाचे अध्यक्ष पी एम पाटील सर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले संपूर्ण भारतात या दोन्ही महापुरुष यांचे फार मोठे योगदान असून दोन्ही नेत्यांना विनम्र अभिवादन करून प्रतिमा पूजन केले. या प्रसंगी अँड वसंतराव भोलाणे, नगरसेवक अहमद पठाण, नंदू पाटील, छोटू जाधव, राजेंद्र फुलपगार, वाल्मिक पाटील, आर एच पाटील, रवींद्र जाधव, बापू जाधव, कैलास पाटील, किशोर पाटील, योगेश पी.पाटील, रघुनंदन वाघ, दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.