जळगाव (प्रतिनिधी) पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” मधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार असे लक्षात आले आहे की, जानेवारी महिन्यात कमी तापमानामुळे तसेच मे महिन्यात जास्त तापमानामुळे जामनेर तालुक्यातील केळी पीक विमा धारकांना फळ पिक विम्याचा लाभ मिळणार असून, कमी तापमानासाठी प्रति हेक्टर २६,५०० तर तापमानासाठी ३५,००० भरपाई मंजुर होणार आहे, अशी माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली आहे.
जामनेर तालुक्यातील नेरी, मालदाभाडी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कमी तापमानामुळे झालेल्या नुकसानीची रु.२६,५००/- भरपाई तर, शेंदुर्णी व पहूर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसानीची रु.३५,०००/- भरपाई तर जामनेर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कमी व जास्त दोन्ही तापमानामुळे झालेल्या नुकसानीची एकत्रित रु.६१,५००/- भरपाई मिळणार आहे अशी माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली.