ठाणे (वृत्तसंस्था) ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बर्ड फ्लूमुळे अचानक कोंबड्या मेल्याने प्रशासनाने याची दखल घेतली आहे. तसेच यासंदर्भात मंत्रालयाकडून सचिव पातळीवर तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खात्याचे सचिव बैठकीत उपस्थित असून सध्या पशुसंवर्धन मंत्री रत्नागिरीत असल्याने त्यांना या बैठकीची माहिती पुरवण्यात आली आहे.
यानंतर पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या परिसरातील २५ हजार कोंबड्यांना बाधा झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर मंत्रालयात सचिव पातळीवर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू अढळल्याने पशुसर्वंधन खात्याने तत्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे. खात्याचे सचिव बैठकीत उपस्थित आहेत. सध्या पशुसंवर्धन मंत्री रत्नागिरीत असल्याने त्यांना या बैठकीची माहिती पुरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आतापर्यंत ३०० कोंबड्या मारल्या
ठाण्यात फ्लूचं प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेश दिले आहेत. अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे. मौजे वेहळोली, ता.शहापूर जि.ठाणे येथे काही कोंबड्या दगावल्या होत्या. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल काल प्राप्त झाला. त्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात इतरत्र कुठेही पसरू नये यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.