पाटना (वृत्तसंस्था) बिहारमधील (Bihar News) शेखपुरामध्ये ५ दिवसांपूर्वीच लग्न झालेली एक नवविवाहिता आपल्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. विवाहिता आपल्याच चुलत भावासोबत फरार असून मुलीच्या वडिलांनी या प्रकरणात अपहरणाची तक्रार दाखल केली. यानंतर हा खुलासा झाला. ही घटना सामस गावातील आहे.
५ फेब्रुवारी रोजी पाटनाच्या रामकृष्ण नगर येथे राहणाऱ्या मुलीचं लग्न शेखपूरातील बरबीधा येथील मुलासोबत ठरलं होतं. लग्नानंतर मुलगी सासरी आली. ४ दिवसांपर्यंत ती सासरी चांगली राहिलीही. ती आपल्या प्रियकरासोबत मिळून काय करणार होती, हे कोणालाही माहिती नव्हतं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी गुरुवारी ती सासऱ्याहून गायब झाली. पती आणि सासरच्या मंडळींनी तपास केला तर खोलीत सोन्या-चांदीचे दागिने नव्हते. यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितलं की, त्यांची मुलगी घरातून दागिने-पैसे घेऊन पळून गेली. यानंतर तातडीने सासरच्या मंडळींना तिचा तपास सुरू केला. यानंतर कळालं की, ती आपल्या चुलत भावासोबत पळून गेली आहे. या प्रकरणात मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.