चोपडा (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया व रमजान ईद हे सण लवकरच साजरे होणार आहेत. या काळात शांतता राहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तालुक्यातील १६ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये चांगलाच वचक निर्माण झाला आहे.
या आरोपीविरुध्द हद्दपारीची कारवाई
शेख फजले शेख हाजी (वय २०, दर्गाअली चोपडा), पवन ऊर्फ गोरख रोहिदास कोळी (बाविस्कर (२५, विरवाडे, ता. चोपडा), परशुराम सुखदेव करणकाळ (३६, पंचशीलनगर, चोपडा), दीपक सुखदेव करणकाळ (३३, चोपडा), वसंत फकिरा विसावे (४५, चांभारवाडा, पाटीलगढी, चोपडा), भुरा ऊर्फ नितीन एकनाथ विसावे (३८, चोपडा), अरमान शेख रहिम (३३, मिल्लतनगर, चोपडा), इरफान शेख रहिम (२९, चोपडा), सईद सय्यद असद (२१. सानेगुरुजी वसाहत, चोपडा), अनिल प्रकाश कोळी (२५, विरवाडे, ता. चोपडा), विलास’ प्रकाश कोळी (२७, विरवाडे), निवृत्ती समाधान धनगर (२०, नरवाडे), राहत अली शराफत अली (४२, शेतपुरा), समीर सलीम पिंजारी (२२, हरीविठ्ठल नगर, जळगाव, ह. मु. चहार्डी), योगराज वसंत कोळी (४०, आडगाव), शेख शाहरुख शेख जाबीर (२२, शेतपुरा).
या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १४४ (२) प्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर यांना प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार अमळनेर उपविभागीय अधिकारी यांनी या आरोपींना दि. २७ पर्यंत चोपडा तालुक्याच्या हद्दीत प्रवेश न करण्याच्या मनाई आदेश जारी केले आहेत. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व चोपडा येथील सहा. पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावळे यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार हि कारवाई पोलिस निरीक्षक के. के. पाटील, स. फौजदार सुनील पाटील, पो. हे. कॉ. विलेश सोनवणे, पो. कॉ. मिलिंद सपकाळे, रवींद्र पाटील यांनी केली.
















