मुंबई (वृत्तसंस्था) कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. यंदाची रणजी ट्रॉफी रद्द करण्यात आली आहे. ८७ वर्षांत प्रथमच रणजी ट्रॉफी बीसीसीआयनं रद्द केली आहे. बीसीसीआयचे सेक्रटरी जय शाह यांनी त्याबाबत प्रत्येक राज्याच्या क्रिकेट संघटनांना पत्र लिहिले आहे. रणजी स्पर्धेला जास्त वेळ लागत असल्याने रणजी रद्द करुन विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा होणार आहे.
बीसीसीआयने देशांतर्गत सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी करंडक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. शाह यांनी पत्राच्या माध्यमातून देशातील विविध राज्यातील संघटनांना याबाबतची कल्पना दिली आहे. ही स्पर्धा रद्द करण्याच्या निर्णयामुळे गेल्या ८७ वर्षांपासूनची परंपरा खंडित झाली आहे. तसेच या निर्णयाचा अनेक खेळाडूंना आर्थिक फटका बसू नये म्हणून बीसीसीआयने नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेतला आहे. रणजीच्या पहिल्या मोसमाचं आयोजन १९३४ मध्ये करण्यात आलं होतं. बीसीसीआय यंदा रणजी ट्रॉफी ऐवजी विजय हजारे ट्राफी आणि सीनियर महिला वनडे स्पर्धेचं आयोजन करण्याच निर्णय घेतला आहे.
खेळाडूंना नुकसान भरपाई
भारतीय क्रिकेटपटू घडवणारी ही सर्वात मोठी स्पर्धा ओळखली जाते. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज ४५ हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI ने घेतला आहे. सय्यद मुश्ताक अली T२० स्पर्धा सध्या सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात. त्यामुळे या स्पर्धा होणार आहेत.
दरम्यान, विजय हजारे स्पर्धा खेळवली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या स्पर्धेचे वेळापत्रक अंतिम करण्यात येईल. त्यानंतर खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. एक महिना ही स्पर्धा चालणार आहे. विजय हजारेसह महिलांच्या वरीष्ठ गटातील वन-डे स्पर्धा खेळवण्याचा निर्णय देखील भारतीय क्रिकेट मंडळाने घेतला आहे.