धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळेसिम येथे मागील भांडणाच्या कारणावरुन एकाला मारहाण केल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, संजय लीलाचंद पाटील (वय ४३) हे पिंपळेसिम येथे परिवारासह वास्तव्यास आहेत. दि. १९ एप्रिल रोजी मागील भांडणाच्या कारणावरुन मणिलाल रुपसिंग पवार याने संजय पाटील यांना मोठ्यामोठ्याने शिविगाळ व दमदाट केली. तर दिपक मणिलाल पवार, दिपक राजाराम पवार, जितेंद्र मणिलाल पवार (सर्व.रा. पिंपळेसिम) मारहाण करण्यास सुरुवात केली. यांच्यातील एकाने संजय पाटील यांना लाकडी दांडयाने डाव्या हाताला जोरात मारल्याने हाताला गंभीर दुखापत झाली. भांडण होत असल्याचे बघून संजय पाटील यांचे चुलत भाऊ ज्ञानेश्वर साहेबराव पाटील हे सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही वरील सर्व संशयित आरोपींनी वाईट साईट शिविगाळ करुन हातबुक्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर, संजय पाटील यांच्या पत्नीला व आईला सुध्दा अश्लिल शिविगाळ केली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पो.हे.कॉ राजेंद्र कोळी हे करीत आहेत.