बीड (वृत्तसंस्था) देशभरात चर्चेत असलेल्या धर्मांतरण प्रकरणांमध्ये युपी एटीएसच्यावतीने तीन जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये एक बीडचा रहिवासी आहे. इरफान शेख सध्या दिल्लीत आहे. इरफान दिल्लीत मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअर मध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये युपी एटीएस न ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला इरफान खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथील रहिवासी आहे, तो सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. दिल्लीतील मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअरमध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये यूपी एटीएसने ताब्यात घेतले आहे. शिरसाळ यातच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. सध्या तो प्रोफेसर आहे, विशेष म्हणजे, अहमदाबाद येथील आयोजित विद्यालयात कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी सिरसाळा गावचे भूमीपुत्र माझे लहान भाऊ प्रा. इरफान खाजा खॉ. पठाण यांचं उत्कृष्ट कार्याबद्दल व्यासपीठावर स्वत: नरेंद्र मोदी यांनी कौतूक करत शाब्बासकीची थाप मारली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या, असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण
उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम हे दोघे दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात राहत होते. मूकबधिर मुलं आणि महिलांचं धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून १ हजारांपेक्षा जास्त लोकांचं त्यांनी धर्मांतर केलं असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं आहे. तपासादरम्यान आरोपींना पाकिस्तानमधील आयएसआय तसंच इतर परदेशा संस्थांकडून पैसा पुरवला जात असल्याचं स्पष्ट झालं.