उस्मानाबाद (वृत्तसंस्था) चार चार वेळा मुख्यमंत्री केलं मी ८२ वर्षांचा झालो, म्हातारा झालो, पण हे कोणाला सांगता मी म्हतारा झालो म्हणून मी कधीच थकणार नाही, तुमची साथ असेपर्यंत हा गाडा सुरूच राहील असे म्हणत जिल्ह्यातील मरगळ आलेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यात उत्साह आणण्याचं प्रयत्न खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.
राज्य चालवायचे असेल राज्याचे भविष्य लोकांचे भविष्य उत्तम व्हायचे असेल तर पुढच्या काळाचा विचार करावा लागतो. देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधिमंडळात लोकांनी मला एकही दिवस सुट्टी दिली नाही. त्या लोकांचे भविष्य चा विचार करायची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही मला काय द्यायचं ठेवलं नाही. ४ वेळ मुख्यमंत्री, ५२ वर्षांपासून निवडून देताय, पुढील काळ लोकांच्या जीवन आणि गावं समृद्ध करण्यासाठी देणार आहे, असं शरद पवार म्हणाले. कोणाला सांगताय म्हतारा झालोय जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
उस्मानाबाद सारख्या ज्या जिल्ह्याने एवढी वर्ष साथ दिली, ठीक आहे काही लोक गेलेले, जे गेले ते गेले, अस म्हणत पूर्वीचे सहकारी पद्मसिंह पाटील यांची आठवण काढली. मात्र, जी तरुण पिढी आहे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी मी आलोय हे राज्य प्रसिद्ध कशासाठी आहे? शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. कोण कोणत्या जातीचा आहे का? अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभं केलं, देशात अनेक राज्य झाली, कुठे मोगल झाले पण छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, असं शरद पवार म्हणाले.
















