भडगाव (प्रतिनिधी) पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एक महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून बापाने खून केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाहीतर मुलीला विहरीत फेकून बापाने स्वतः देखील विहीरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात जितेंद्र जंगलु ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात सविता नाना भिल (वय २०, रा. कराब ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ जून २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेच्या सुमारास जितेंद्र (नाना) जंगलु ठाकरे याने सविता यांच्या चरित्रावर संशय घेऊन त्यांच्या आई-वडिलांसोबत भांडण केले. यानंतर मुलगी खुशी जितेंद्र (नाना) ठाकरे (भिल) वय १ महिना २८ दिवस हीला विहिरीत फेकून देऊन तिचा खून केला. यानंतर जितेंद्र याने स्वतःदेखील विहीरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात जितेंद्र जंगलु ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून असून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत.